Tuesday, November 17, 2020

खरी लक्ष्मी!!!

पण काहीही म्हणा
ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं , जावा , नातवंडं एकत्र येतात
सर्वजण मिळून कामं करतात
तिथं खरंच प्रसन्न वाटतं , करमतं !
दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !

मित्र हो ,
हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते !

ती येते , रहाते , जेवते आणि जातांना म्हणते
खुशाल रहा असंच मिळून मिसळून रहात जा !

कुणी आणि का लावलं असेल आपल्या मागे हे सगळं ?
शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ या सणसमारंभाना ?
थोडा विचार केला , चिंतन केलं
तर आपल्याला कळेल..........

या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं
आपुलकीला उधाण येतं
माणसं एकत्र येतात ,भेटतात , बोलतात
आणि पुन्हा आपापल्या गावी परत निघून जातात ......!

बैठकीत झालेली माणसांची गर्दी
आणि दारा समोर झालेली पादत्राणांची , पाऊलांची दाटी हीच खरी लक्ष्मी .......!

चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छता खाली येणं
गुण्यागोविंदाने रहाणं
आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं ...... हीच खरी लक्ष्मी !

पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक
दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा
तुम्ही राहूद्या मी करते असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट
हीच खरी लक्ष्मी ....!

मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका
ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते 
सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते
एखाद्या वेळेस रागवत असतील पण मनात ठेवत नव्हते
ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं
 
योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं ...... हीच खरी लक्ष्मी !

मला मला करण्यापेक्षा
तू घे , तू घे चा आग्रह करणे
आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा 
अशी जेष्ठांनी केलेली मायेची सूचना
घर, कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी केलेला प्रत्येक सदस्याचा त्याग

....हीच खरी लक्ष्मी ....!
...हीच खरी लक्ष्मी.....!
               🌟🙏🏻🌟